सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सुपे : दीपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे विविध कार्यकारी सोसायटीच्या १३ जागांसाठी रविवारी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलने सर्वच्या सर्व १३ जागा जिंकुन भरघोस यश मिळावले. तर प्रस्तापितांच्या राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी विकास सहकारी पॅनेलचा धुव्वा उडावला. त्यांच्या पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही.
येथील संस्थेची निवडणुक चुरशी होत असल्याने कोणत्या पॅनेलची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र अखेरच्या टप्प्यात शेतकरी परिवर्तन पॅनेलने बाजी मारली.
राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलने नितीन खैरे, मनोज खैरे आणि अविनाश खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या व जुन्या उमेदवारांचा संगम करुन १३ पैकी १३ जागा जिंकुन घवघवीत यश मिळविले. निवडुन आलेले उमेदवार पुढील प्रमाणे - अमित काळखैरे, मनोज खैरे, मल्हारी खैरे, विलास खैरे, सागर खैरे, बापुराव चांदगुडे, जालिंदर पवार, दत्तात्रय हिरवे, पारुबाई काळखैरे, उज्वला खैरे, पांडुरंग कुदळे, निलेश तांबे, गणेश कदम अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी मिलींद टांकसाळे, सचिव दिगंबर लोणकर यांनी दिली.
तर राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी सहकारी पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. त्यांच्याकडे उमेदवार हेच पॅनेल प्रमुख होते. मात्र प्रस्तापितांना सभासदांवर प्रभुत्व मिळवता आले नाही. या पॅनेलचा सुमारे ५० ते ८० मताच्या फरकाने पराभव झाला. त्यांना अखेर एकही जागा जिंकता आली नाही.
दरम्यान जनतेचा कौल आम्हाला मान्य असल्याची प्रतिक्रिया विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत खैरे यांनी दिली.
...................................
COMMENTS