सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील बाबुर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी शांताराम लक्ष्मण ढोपरे यांची तर व्हायचेअरमनपदी उत्तम आबूराव लडकत यांची एकमताने निवड करण्यात आली.
नुकतीच या संस्थेची पंचवार्षिक निवडणुक ही बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब पोमणे, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब पांडूरंग लडकत, जेष्ठ मार्गदर्शक हौशिराम पोमणे, साहेबराव पोमणे, राजकुमार लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध करण्यात आली होती बाबूर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ही सुपे परिसरातील एक नामकींत अशी संस्था असून आजपर्यंत या संस्थेची स्थापना झाल्यापासून कधीच निवडणूक झाली नसून ही संस्था सर्वांना विश्वासात घेऊन वाटचाल करत आहे चेअरमन तसेच व्हाय चेअरमन यांची निवड बिनविरोध पार पाडण्यासाठी सरपंच ज्ञानेश्वर पोमणे, उपसरपंच अँड दिपाली जगताप, पोलिस पाटील वनिता लव्हे, दत्तात्रय ढोपरे तसेच सर्व संचालक,सभासद बंधू यांचे मोलाचे सहकार्य लाभले
COMMENTS