सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
पुणे-सातारा महामार्गावरील वरवे ता.भोर येथे झालेल्या अपघातात जेष्ठ दुचाकी चालक काशीनाथ सोनबा गायकवाड रा.भोलावडे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काशिनाथ सोनबा गायकवाड वय ७२ राहणार भोलावडे ता.भोर हे आपल्या पत्नीसह रविवार दि-१७ चारच्या सुमारास महामार्गावरून दुचाकीने भोर येथून वरवे गावाकडे जात होते. त्यावेळी वरवे येथे मागून येणाऱ्या मोटारीची त्यांच्या दुचाकीस धडक बसली.मोटर चालक संतोष विठ्ठल मोरे वय-४५ रा. घणसोली (मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे. गायकवाड हे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते होते उत्कृष्ट पखवाज व तबला वादक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या मागे पत्नी ,चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
COMMENTS