सोमेश्वरनगर दि १९
वाघळवाडी येथील शेतामध्ये पाणी देण्यासाठी गेलेल्या एका महिला तुटलेली पाइपलाइन जोडू नका म्हणत आई व मुलाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी करंजेपूल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आले
याबाबत सविस्तर, फिर्यादी अनंत सकुंडे यांची आई या वाघळवाडीतील जमीन गट नं.295 मध्ये पाणी देण्यासाठी गेली असता आरोपी 1) संतोष जर्नाधन संकुडे 2) पोपट जर्नाधन सकुंडे 3) सोहम उर्फ माऊली संतोष सकुंडे 4) संतोष शंकर मोरे 5) वैभव संतोष मोरे सर्व वाघळवाडी ता बारामती जि पुणे हे तेथे आले व फिर्यादीची पाईप लाईन तोडुन त्यांची पाईप लाईन जोडत असताना फिर्यादीची आई त्यांना पाईन लाईन जोडु नका असे म्हणालेचे कारणावरुन फिर्यादीचे आईला शिवीगाळ दमदाठी केली, सदर ठिकाणी फिर्यादी गेल्यावर यातील आरोपी नं 1 याने फिर्यादीस पाठीमागुन कवळ घालुन पकडुन आरोपी नं 2 याने त्याचे हातातील खो-याचे दांडयाने व खो-याचे पात्याने फिर्यादीचे पायावर मारहान करून आपखुशीने दुखापत केली , तसेच आरोपी नं 3 याने त्याचे हातात दगड घेऊन फिर्यादीचे उजवे कानाजवळ मारून दुखपत केली आहे, त्यावेळी आरोपी नं 4 हा त्याचे हातामध्ये कोयता घेऊन फिर्यादीस मारण्यासाठी धावुन आला व विहीरीमध्ये टाका अशी धमकी दिली, तसेच यातील आरोपी नं 5याने हातात दगड घेऊन फिर्यादीस मारहान केली आहे. तसेच यातील आरोपी नं 3 याने फिर्यादीस तु लय कोर्ट कचेरी करतो, तुझ्यामुळे आंम्हाला लय त्रास झाला आहे, तुला आता सोडत नाही, अशी धमकी दिली आहे. तसेच वरील सर्वानी मिळुन फिर्यादीचे हातापायांवर, डोक्यावर, पाठीवर, 20 ते 25 फटके मारले आहेत, त्यावेळी फिर्यादीची आई भांडणे सोडवत असताना तीलाही आरोपी नं 2 याने खो-याचे दांडक्याने पायाचे गुडघ्यावर मारहान व शिवीगाळ दमदाटी केली आहे. आमची भांडणे सोडवत असताना आरोपी नं 2 याचे बरोबर झालेल्या झटापटीमध्ये फिर्यादीचे आईचे गळयातील 41 ग्रॅम वजनाचे गंठण काढुन घेतलेले आहे असे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून पुढील तपास करंजेपूल चे पो स ई शेलार सो हे करीत आहेत.
COMMENTS