पुणे जिल्हा परिषदेचा वाणेवाडीतील हा आरोग्य कर्मचारी रोज दारू पिऊन घालतोय धिंगाणा : याला नक्की वरदहस्त कोणाचा ? बारामती आरोग्य विभागाचा की पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा? जमतेला त्रास देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का?

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टिम---------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वानेवाडी येथील एक आरोग्य कर्मचारी सकाळी नऊ वाजल्यापासून दारूच्या नशेत टाईट असतो... तो दारू पिउन जनतेला नाहक त्रास देण्याचे काम करत असतो. त्याला नक्की कोनाचा वरदहस्त आहे...या बाबत चर्चा सुरु असुन.. याला जिल्हा परिषद व बारामती  आरोग्य विभागाचा हात असल्याचे बोलले जात आहे.
              मंग तो दिवसभर दारू पीत असतो तर मंग तो काम कधी करतो. त्याला चाळीस हजार पगार कसा दिला जातो. याबाबत लोकांच्यात तर्क वितर्क सुरू आहेत.
बारामती तालुक्यातील आरोग्य कर्मचारी गेल्या कित्येक वर्षांपासून एकाचठिकाणी ठाण मांडून आहेत. त्यांच्या बदल्या न होण्यामागे काही गौडबंगाल आहे का असा सवाल ही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. बदली झालीच तर वशिल्याने त्यांना जवळचे आरोग्य केंद्र अथवा उपकेंद्र दिली जातात. कोरोना काळात आरोग्य कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले असतानाच गावच्या राजकारणात ही काही सरकारी कर्मचारी लक्ष घालत असून याला आळा घालण्याची गरज आहे. बारामती तालुक्यातील पंचायत समितीचे कार्यालय राज्यातील एक मॉडेल म्हणून प्रसिध्द होत असतानाच पदाधिकाऱ्यांच्या पुण्याईने कर्मचारी आपले रंग दाखवत आहेत. विनाकारण बारामतीला जाणे, वेळेवर कामावर हजर न राहणे, मोबाईल बंद करून ठेवणे, नागरिकांशी असभ्य वर्तन करणे आदी तक्रारी सोमेश्वर परीसरातील ग्रामस्थ करत आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे तालुक्यातील जनतेशी सौदार्यपुर्ण व्यवहार करत त्यांच्या विकासासाठी रांत्रदिवस एक करत असताना अशा काही कर्मचाऱ्यांमुळे आरोग्य खाते बदनाम झाले आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
To Top