आमच्या गावात उभा आहे तुला घरी नीट जायच आहे का ? सासवडच्या ट्राफिक जाममध्ये पुरंदरकरांचं असभ्य वर्तन

Pune Reporter



बारामती दि १८

काल सासवड आणि जेजुरी परिसरामध्ये पुणे पंढरपूर रस्त्यावर ट्रॅफिक जाम अनुभवलं पुण्याहून  येत असताना लांबच्या लांब चारचाकी वाहनांच्या रांगा ‍रस्त्याच्या कडेला शेतातून मार्ग काढत कसातरी तो टप्पा नागरिकांनी पार केला.

 पण या टप्प्यामध्ये असभ्यतेचे दर्शन जाणवून आले ट्रॅफिक जाममुळे  हजारो वाहने रस्त्यावर उभी होती त्या वाहनांमधून प्रवास करणाऱ्या असंख्य नागरिकाच्या कुटुंबातील लहान मुले,मुली ,महिला होत्या उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यामुळे आणि त्यात वाहतूककोंडीमुळे  गरमी असह्य झाल्याने अनेक नागरिक वाहनांच्या कडेला उभी होती यामध्ये असंख्य माता भगिनी रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या .
आसपासच्या यात्रा ,जत्रा आणि अन्य कार्यक्रमावरून नशा करून आलेले तरुण रस्त्याच्या कडेने वाट काढत हुल्लडबाजी करत शीळ घालत शिवराळ भाषा वापरत, असभ्य वर्तन करताना मिळून आले अनेकांनी त्यांनी हटकण्याचा प्रयत्न केला असता नशेमध्ये ते काय करताहेत त्यांना त्याचं भान नव्हतं उलट त्या हटकणाऱ्या व्यक्तींना ते म्हणत होते आमच्या गावात उभा आहे तुला घरी नीट जायच आहे का ? असा दम देत  पुढचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला नाइलाज होता त्यामुळे वाटसरू प्रवासी गप्प राहिले या ट्रॅफिक जॅममुळे सध्या  आपलं कुटुंब आपण आपल्या माताभगिनी रस्त्यावर किती सुरक्षित आहेत याचं दर्शन काल घडून आलाय .
To Top