सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील आरोग्य कर्मचारी गेल्या कित्येक वर्षांपासून एकाचठिकाणी ठाण मांडून आहेत. त्यांच्या बदल्या न होण्यामागे काही गौडबंगाल आहे का असा सवाल ही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
बदली झालीच तर वशिल्याने त्यांना जवळचे आरोग्य केंद्र अथवा उपकेंद्र दिली जातात. कोरोना काळात आरोग्य कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले असतानाच गावच्या राजकारणात ही काही सरकारी कर्मचारी लक्ष घालत असून याला आळा घालण्याची गरज आहे. बारामती तालुक्यातील पंचायत समितीचे कार्यालय राज्यातील एक मॉडेल म्हणून प्रसिध्द होत असतानाच पदाधिकाऱ्यांच्या पुण्याईने कर्मचारी आपले रंग दाखवत आहेत. विनाकारण बारामतीला जाणे, वेळेवर कामावर हजर न राहणे, मोबाईल बंद करून ठेवणे, नागरिकांशी असभ्य वर्तन करणे आदी तक्रारी सोमेश्वर परीसरातील ग्रामस्थ करत आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे तालुक्यातील जनतेशी सौदार्यपुर्ण व्यवहार करत त्यांच्या विकासासाठी रांत्रदिवस एक करत असताना अशा काही कर्मचाऱ्यांमुळे आरोग्य खाते बदनाम झाले आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
--------------
वाणेवाडीतील तो आरोग्य कर्मचारी रोज दारू पियुन घालतोय राडा--------
वाणेवाडी गावातील एक कर्मचारी कुठंतरी कामाला आहे एवढंच नागरिकांना माहीत आहे. मात्र त्याला कामावर जाताना अजून कोणी पाहिलं नाही. मंग त्याला संबंधित विभागाचा महिन्याला ४० हजार पगार मिळतोच कसा. त्याला काधिपन पाहिलं तरी तो नशेतच असतो. जनतेच्या पैशावर उड्या मारणाऱ्या या कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
COMMENTS