सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर ता. बारामती येथिल श्री सावता महाराज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे निवडणूक बिनविरोध करण्यास यश आले. अध्यक्ष उपाध्यक्ष निवड प्रक्रिया सुद्धा बिनविरोध पार पडली. सोमेश्वर चे माजी संचालक अनिलकुमार शहा हनुमंत बनकर, दत्तात्रय गिरमे, मारुती पानसरे, सुरेश हिरवे, महादेव शिंदे, बाळासो हिरवे, रघुनाथ आगम, मधुकर शिंदे यांच्यासह सोसायटीचे यापुर्वीचे सर्व पदाधिकारी यांनी संस्थेचे हित लक्षात घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले होते नुकतीच अध्यक्ष उपाध्यक्ष निवड प्रक्रिया पार पडली यामध्ये शिवाजी गोविंद नेवसे यांची अध्यक्षपदी तर वनिता चंद्रकांत जाधव यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली संचालकपदी राजकुमार शहा, जीवन बनकर, अशोक हिरवे, बाळासो राऊत, श्रीरंग शिंदे, राजेंद्र पानसरे, शब्बीर बागवान, प्रकाश जाधव, हरिश्चंद्र आगम, सुलोचना हिरवे, बापू खुडे यांची निवड करण्यात आली. सचिव गणेश हिरवे सहसचिव अमोल भोसले यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
COMMENTS