सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील निंबुत आनंदनगर येथील आरोही निलेश कुंभार वय ६ हिला गेल्या तीन महिन्यांपासून कर्करोग आजाराशी झुंज देत असून तिच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे आवाहन वडील निलेश कुंभार यांनी केले आहे.
सद्या तिच्यावर टाटा हॉस्पिटल मुंबई याठिकाणी उपचार सुरू असून तिच्या उपचारासाठी २५ लाख ५० हजार रुपयांची गरज आहे. याबाबत आरोहीचे वडील निलेश कुंभार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना केलेल्या आवाहनात म्हंटले आहे की, माझी मुलगी तिच्या आयुष्यासाठी लढत आहे आणि तिला वाचवण्यासाठी आम्हाला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. माझी मुलगी क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमिया (BMT) ग्रस्त आहे आणि तिच्यावर SRCC चिल्ड्रन हॉस्पिटल, मुंबई येथे उपचार सुरू आहेत, यासाठी निधी उभारत आहे. उपचारासाठी आवश्यक असलेली एकूण रक्कम गोळा करण्यासाठी कुटुंबाने सर्व काही केले आहे परंतु सर्व वैद्यकीय खर्चासाठी २५ लाख ५० हजार रुपये आवश्यक आहेत. आवश्यक रक्कम खूप मोठी असल्याने, मी आपणास कृपया योगदान देण्याची विनंती करतो.
संपर्क : निलेश कुंभार
मोब : 9421832620
Nilesh Gulabrao Kumbhar
A/C:-32171692237
IFSC:- SBIN0001918
9421832620 PHOAN PAY GOGAL PAY
COMMENTS