बारामती दि २२
सोमेश्वरनगर परिसरामध्ये दि२२ एप्रिल रोजी सायंकाळी ६.०० वाजल्यापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.पावसाच्या हलक्या सरी सोमेश्वरनगर परिसरात पडत असून ठिकठिकाणी रस्ते निसरडे झाले आहेत विशेषकरून नीरा बारामती रस्त्यावरती वाहनांची आसपासच्या गावांत मध्ये असणार्या यात्रा मुळे वर्दळ आहे .
सायंकाळपासून अनेक वाहने नीरा - बारामती रस्त्यावरून निसरडा झाल्याकारणाने घसरून पडली असून किरकोळ अपघात घडले आहेत त्यामुळे नागरिकांनी या रस्त्याचा वापर करत असताना वाहने सावकाश चालवावी असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
COMMENTS