सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : सचिन पवार
सुपे मोरगाव अष्टविनायक मार्गावर डायमंड चौक सुपे येथे भरघाव वेगान आलेल्या ट्रक हॉटेलमध्ये शिरल्याने भिषण अपघात झाला आहे.
चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याचा ताबा सुटल्याने हा प्रकार घडला असुन या घटनेत तीन व्यक्ती चिरडले असुन प्राथमिक माहितीनुसार या मध्ये एक महिला व दोन पुरूष गंभीर जखमी झाले आहेत , जखमीना सुपे येथील ग्रामीण रुग्णालय व केडगाव साई दर्शन येथे उपचारासाठी पाठविले आहे ,
या घटनेची माहिती समजताच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचा स्टाप तत्परतेने घटना स्थळी पोहचला व जखमींचा उपचारासाठी पाठविले,