बारामती ! लघुशंके थांबलेल्या त्या युवकावर काळाचा घाला : जेजुरी-मोरगाव रस्त्यावर अपघातात भवानीनगरचा युवक ठार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
मोरगाव : प्रतिनिधी
मोरगाव जेजुरी रस्त्यावर आज झालेल्या अपघातात  भवानीनगर येथील एका तीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. लघुशंकेसाठी ते थांबले असता. मोटारसायकलने जोरदार ठोस दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला
         मोरगाव - जेजुरी रस्त्यावर आज दि २९ रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास भवानीनगर येथील  चार मित्र चारचाकी वाहनाने  जेजुरी वरुन  भवानीनगर येथे येत असताना चोरवाडी  परीसरात आले असताना लघुशंकेसाठी थांबले होते . यामध्ये   विनोद जाधव (वय वर्षे ३२ ) रा  भवानीनगर ता इंदापुर जि.पुणे  हे सुद्धा थांबले होते. याच दरम्यान अज्ञान दुचाकीने जोरदार ठोस दिल्याने  विनोद यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना उपचारासाठी मोरगाव जेजुरी रस्त्यावरील सिद्धिविनायक हॉस्पिटलला हलविण्यात आले होते . मात्र डॉक्टरांनी त्यांना म्रुत घोषित केले .
To Top