सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
राज्यात गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूकीचे संनियंत्रण व देखरेख करण्यासाठी "महाखनिज” ही संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यामाध्यमातून गौण खनिजाची अवैध उत्खनन व अवैध वाहतूक रोखण्याकरीता गौण खनिजाचे वाहतूक करणाऱ्या वाहनावर GPS व्दारे Real Time Monitoring
द्वारे आता वॉच ठेवला जाणार आहे.
यामुळे ते वाहन नक्की कोठे आहे. त्याने फाडलेल्या रॉयल्टी पावतीच्या वेळेत ते वाहन ठरवून दिलेल्या ठिकाणी खाली झाले का हे आता समजणार आहे. तसेच पावती जेवढ्या वेळेची फाडली आहे तेवढाच वेळ त्या पावतीला मुदत राहणार आहे. वेळ संपल्या नंतर त्या रॉयल्टी च्या पावतीची मुदत संपणार आहे.
शासनाच्या असणाऱ्या अप्स मध्ये गाडीचा नंबर जाणार, गाडीचा तीन फोटो शासनाच्या अप्स मध्ये सेव्ह राहणार आहेत. गाडीला जो वेळ दिला आहे त्याला मुदत असणार आहे, त्याच रस्त्याने गाडी चालली आहे का gps द्वारे वाच ठेवला जाणार आहे.
याबाबत महसूल व वन विभागाचे सह सचिव रमेश चव्हाण यांनी काढलेल्या आदेशात म्हणटले आहे की, राज्यात गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूकीचे संनियंत्रण व देखरेख करण्यासाठी "महाखनिज” ही संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यामाध्यमातून गौण खनिजाची अवैध उत्खनन व अवैध वाहतूक रोखण्याकरीता गौण खनिजाचे वाहतूक करणाऱ्या वाहनावर GPS व्दारे Real Time Monitoring करण्याकरीता गौण खनिजाचे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर GPS Device ३१ मे. २०२२ पर्यंत बसविण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक
१. दिनांक २३.०२.२०२२ च्या पत्रान्वये निर्देश देण्यात आले आहेत.
०२. सदर निर्देशाच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही पूर्ण करण्याबाबत व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक २ दिनांक १९.०५.२०२२ च्या स्मरण पत्रान्वये स्मरण करण्यात आले आहे.
०३. तथापि, त्यानुसार अपेक्षीत कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. तसेच, त्यानुषंगाने केलेल्या कार्यवाहीबाबतचे अहवाल क्षेत्रीय स्तरावरून शासनास अद्याप प्राप्त झालेले नाहीत. ०४ आता या पत्राव्दारे गौण खनिजाचे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर GPS Device
बसविण्याबाबत ३१ जुलै, २०२२ पर्यंत मूदतवाढ देण्यात येत आहे. सदर मुदतवाढ कालावधीत गौण
खनिजाचे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर GPS Device बसविण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करून घेण्याची सर्व जबाबदारी संबंधीत अधिकारी यांची असेल. तसेच, यापूढे या प्रकरणी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. तरी, संदर्भाधीन पत्रान्वये देण्यात आलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने गौण खनिजाचे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर GPS Device बसविण्याची तात्काळ कार्यवाही पूर्ण करावी व केलेल्या कार्यवाहीची माहिती तातडीने शासनास सादर करावी.
COMMENTS