सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
राजगड सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक २०२१-२२ रविवार दि.२९ रोजी शांततेत पार पडत असून २९ केंद्रांवर ४४ टक्के मतदान झाले होते.
ही निवडणूक ७ जागांसाठी झाली असून १० जागा निवडणुकी अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या.मंगळवार दि.३१ आयटीआय कार्यालय येथे मतमोजणी सकाळी ९ वाजता सुरू झाली असून राजगड सहकारी पॅनेलचे ७ उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
मतदान हे भोर, वेल्हा,हवेली,खंडाळा तालुक्यातील मतदारांनी सकाळी ८ ते सायं ५ वाजेपर्यंत २९ केंद्रांवर पार पाडले होते.यात ६६७ स्त्रियांनी तर ५३२० पुरुषांनी असे एकुन ५९८७ सभासदांनी मतदान केले असून ४४ टक्के मतदान झाले होते.सद्या मतमोजणी शांततेत सुरू आहे .काही वेळातच निकाल जाहीर होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली.मतदान मोजणी केंद्रांवर भोर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे.
COMMENTS