सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बारामती ! साहेबरावदादा सोसायटी निंबुतची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध १११ वर्ष निवडणुकीची परंपरा कायम : सतिशराव काकडे

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री साहेबराव दादा विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या. निंबुत ता. बारामती, जि.पुणे या संस्थेची सन २०२१-२२ ते २०२६-२७ ची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध पार पडली. तसेच चेअरमन पदी अजित सर्जेराव काकडे व व्हाईस चेअरमन पदी दत्तात्रय बबनराव काकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेची स्थापना दि.२७/७/१९१९ रोजी कै. साहेबराव दादा काकडे यांनी केली होती. आज संस्थेस १११ वर्ष पूर्ण होत आलेली आहेत. संस्थेची सन १९९१ पासुन आज अखेर पर्यंत संचालक मंडळाची बिनविरोध निवड होत आलेली आहे. या संस्थेचे कामकाज आजपर्यंत अनेक मोठ्या नेत्यांनी पाहिलेले असुन त्यामध्ये कै.मुगूटराव आप्पा काकडे, कै. बाबालाल काकडे, कै. भगवाननाना काकडे, श्री शामराव काकडे व श्री सतिशभैय्या काकडे यांनी सक्षमपणे संस्थेच्या भरभराटीमध्ये महत्वपुर्ण योगदान दिलेले आहे.
        संस्थेची सभासद संख्या ७५० इतकी असुन निंबुत गावामध्ये चार सहकारी सोसायट्या असताना देखील संस्थेची वार्षिक उलाढाल अंदाजे ५ कोटी रूपये आहे. संस्था सभासदांना गेली २५ वर्षे सतत ९ ते १२ टक्के लाभांश वाटप करीत आलेली आहे. संस्थेने सुमारे ६००० लोकसंख्या असलेल्या गावात २५ वर्षापुर्वी ३०० मेट्रीक टनाचे स्वभांडवली बांधलेले गोडावुन आहे. त्यामधुन संस्थेच्या सभासदांना शेतीसाठी रासायनिक खतांची माफक दरात विकीची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच १९९८ साली संस्थेने ५००० स्के. फुटाची स्वभांडवलातुन बांधलेली सुसज्ज इमारत आहे. त्याच्या तळमजल्यावर संस्थेचे सुसज्य अशी संगणीकृत शाखा असुन दुसऱ्या बाजुला संस्थेच्या इमारती मध्ये पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची शाखा आहे, मागील बाजुस टेलीफोन एक्सचेंजचे ऑफिस आहे व पहिल्या मजल्यावर गरीब, गरजु व सर्वसामान्य सभासदांसाठी मंगल कार्यालयाची सोय अल्पदरात उपलब्ध करण्यात आलेली असुन त्यामध्ये स्वयंपाकाचे सर्व साहित्याचा देखील उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे संस्थेच्या वतीने गेल्या ५० वर्षांपासुन रोशनींग वाटप देखील करण्यात येते जेणे करून गोरगरीब जनतेसाठी शासनाच्या वतीने वाटप करण्यात येणाऱ्या वस्तु त्यांच्या पर्यंत पोहच करता येतील. तसेच संस्थेच्या वतीने हुशार, गरीब व गरजु विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन व आर्थिक मदत करते.
       तरी साहेबराव दादा सोसायटीच्या नुतन चेअरमन पदी  अजित सर्जेराव काकडे व व्हाईस चेअरमन पदी श्री दत्तात्रय बबनराव काकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक म्हणुन  प्रियराज उर्फ अभिजित काकडे,  संभाजीराव काकडे,  विलास दत्तात्रय काकडे, राजकुमार बनसोडे, विलास काकडे, मोहन जगताप, धनंजय काकडे, संतोष सुर्यवंशी, भुषण लकडे, श्रीमती लिलावती काकडे व रंजना काकडे यांची बिनविरोध निवड झालेली आहे. सदर कार्यक्रमासाठी निवडणुक अधिकारी म्हणुन मिलींद टंगसाळे साहेब व श्री अमर गायकवाड साहेब यांनी कामकाज पाहिले. यावेळी नुतन चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ यांचा व माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ यांचा सत्कार शामराव साहेबराव काकडे, सतिशराव शिवाजीराव काकडे व जेष्ठ सभासदांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  राजकुमार बनसोडे यांनी केले. सभासदांना मार्गदर्शन करताना श्री सतिशराव काकडे यांनी संस्थेच्या सर्व सभासदांचे निवडणुक बिनविरोध केल्या बद्दल आभार मानले. चालु वर्षी संस्थेस अंदाजे ११ लाख रूपये नफा झालेला असुन त्यातुन सभासदांना वार्षिक सर्व साधारण सभा झाल्यानंतर जास्तीत जास्त डिव्हीडंट वाटप करण्याचा प्रयत्न राहणार आहे. कार्यक्रमास उपस्थित सर्व सभासद व ग्रामस्थांचे आभार संभाजीराव काकडे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमास सर्व संचालक मंडळ, संस्थेचे सचिव, गावचे तलाठी, बँकचे विकास अधिकारी, ग्रामसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7051,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामती ! साहेबरावदादा सोसायटी निंबुतची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध १११ वर्ष निवडणुकीची परंपरा कायम : सतिशराव काकडे
बारामती ! साहेबरावदादा सोसायटी निंबुतची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध १११ वर्ष निवडणुकीची परंपरा कायम : सतिशराव काकडे
https://lh3.googleusercontent.com/-XMp15O0UmXQ/YpX0-fiUw6I/AAAAAAAARjQ/7BoRNFr5u7MDM4T5-Ed4jpd4hVOE5bizgCNcBGAsYHQ/s1600/1653994732054878-0.png
https://lh3.googleusercontent.com/-XMp15O0UmXQ/YpX0-fiUw6I/AAAAAAAARjQ/7BoRNFr5u7MDM4T5-Ed4jpd4hVOE5bizgCNcBGAsYHQ/s72-c/1653994732054878-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/05/blog-post_830.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/05/blog-post_830.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy