सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी(ता. बारामती) येथील कृष्णाई पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुनिल रघुनाथ भोसले आणि उपाध्यक्षपदी दीपक साखरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पतसंस्थेच्या कार्यालयात मंगळवारी(दि.३१) रोजी पार पडलेल्या संचालकमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बारामतीचे सहाय्यक निबंधक मिलिंद टांकसाळे आणि अमर गायकवाड यांच्या उपस्थितीत सन २०२२-२०२६ या कालावधीसाठी ही निवड करण्यात आली. कृष्णाई पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक गत महिन्यात बिनविरोध पार पडली होती. यावेळी ज्येष्ठ नेते रघुनाथराव भोसले, ॲड. नवनाथ भोसले, सचिव हिम्मत भोईटे, सर्व संचालकमंडळ उपस्थित होते.
संपूर्ण बारामती तालुका कार्यक्षेत्र असलेल्या पतसंस्थेचे १२०० सभासद आहेत. भागभांडवल १८ कोटी असून पतसंस्थेने १४ कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे तर ठेवी १५ कोटी ३० लाख रुपये आहेत. कृष्णाई पतसंस्था तालुक्यातील नावाजलेली पतसंस्था असून अनेक तरुणांना उद्योग उभे करायला पतसंस्थेने सहकार्य केले आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून सभासदांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन नवनियुक्त अध्यक्ष सुनिल भोसले आणि उपाध्यक्ष दीपक साखरे यांनी यावेळी दिले. संचालकमंडळाच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.
------------------------------
संचालक मंडळ पुढीलप्रमाणे: -
सुनिल भोसले, उत्तम भोसले, संदीप भिलारे, खंडेराव पोकळे, दीपक भोसले, संतोष भोसले, सोनाली सुर्यवंशी, उज्वला शिंदे, दीपक साखरे, बाळासो गडदे, विठ्ठल खुडे.
COMMENTS