सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
भोर : संतोष म्हस्के
भोर शहराशेजारील उञौली फाट्यावरील ऐतिहासिक चिञपटाचे साहित्य ठेवलेल्या गोडाऊनला आग लागुन चित्रपट शूटिंगचे १० लाखांच्या आसपास असणाऱ्या किमतीचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना बुधवार दि. १ सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली.आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. भोर -शिरवळ रस्त्यावरील उञौली गावाच्या हदर्दीत जगन्नाथ शेटे रा. उञौली ता .भोर यांची पाच गोडाऊन एक ऐतिहासिक चिञपट निर्मात्या कंपनीने भाडयाने घेतली होती.सदर गोडाऊनमध्ये पावनखिंड या चिञपटासह इतर ऐतिहासिक चिञपटाला लागणारे तंबु,तलवारी ढाल दानपटटे,पेटारे,लोखंडी झुंबर,लाकडे,फर्निचर,पुतुळे अशा विविध प्रकारचे साहित्य होते.सायंकाळी सहा वाजता अचानक आग लागुन आतिल दोन सिलेंडरचा स्फोट होऊन संपुर्ण साहित्य जळुन खाक झाले आहे. दरम्यान आग कशामुळे लागली हे समजु शकले नाही.आग लागल्याची माहिती मिळताच भोर नगरपलिकेचा आग्निशामक बंबाच्या मदतीने अग्निशामक बंबावरील कर्मचारी सागर पवार ,रुषी शेटे,आकाश सागळे,दत्ताञय पवार,आमिर आतार यांच्यासह सह्याद्री सर्च अँन्ड रेस्क्यु फोर्सच्या सदस्यांनी सुमारे दोन तासानंतर आग आटोक्यात आणली.यावेळी पोलीस निरीक्षक विठठल दबडे व पोलीस कर्मचारी यांनी आग विझवण्यासह वाहातूक सुरळीत केली.
COMMENTS