सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : प्रतिनिधी
वाई पोलिस ठाण्यात बाळासाहेब भरणे पोलिस निरिक्षक म्हणून हजर झाल्या पासून खानापुर ता.वाई या गावात सनी काशीनाथ भोसले हे कुटुंब गेल्या अनेक वर्षां पासून दारुची चोरटी वाहतुक आणी विक्री करात असल्याची माहिती खबर्या मार्फत मिळत होती . गेल्या २० वर्षा पुर्वी सनीचा बाप काशीनाथ हा स्वताह दारु काढून त्या मध्ये विषारी द्रव्य मिसळून दारुची विक्री वाई वाठार रस्त्यावरील शांतीनगर हद्दीतील एका ओढ्यात करत असताना या अड्यावरील मोल मजुरी करणार्या शेत मजुरांनी दारु पिली होती त्या वेळी तब्बल ११ जनांचा दारुतुन विष बाधा झाल्याने मृत्यू झाला होता या वर वाई पोलिसांनी ११ जणांच्या मृत्यूला जबाबदार धरुन सनीच्या आईला अटक करून जेल मध्ये पाठवले होते पण यातील मुख्य आरोपी असलेला काशीनाथ भोसले हा अद्याप फरारी आहे .तोच दारुचा अड्या आजही सतत
पोलिसांना गुंगारा देत खानापुर गावात सनी भोसले चालवत असल्याची माहिती खबर्या मार्फत मिळताच त्या ठिकाणी डिबी पथकाने सापळा रचून धाड टाकली असता आरोपी सह ३ हजार ६०० रुपये किमतीच्या ७२ देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात डीबी पथकाला यश आले असल्याने चोरुन दारु विकणारे आणी वाहतुक करनार्यांचे धाबे दणाणले आहेत . सनी भोसले याच्या वर तडीपारीची कारवाई वाई पोलिस स्टेशन मार्फत करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे .गाव दारुमुक्त करण्या साठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही बाळासाहेब भरणे यांनी खानापुर ग्रामस्थांना केले आहे .
वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि खानापुर ता.वाई हे राजकीय दृष्ट्या जागृत असलेले गाव आहे येथील नागरिकही जागृत आहेत या गावाला नेहमीच चांगल्या कामाला पोलिसांचे सहकार्य असते असे असताना येथील सरपंच विकास सोसायटीचे चेअरमन तंटामुक्ती अध्यक्ष आपल्या गावात सनी काशीनाथ भोसले हा चोरुन दारु विक्रीचा धंदा कसा काय करतो याचेच आच्यर्य वाटत आहे .
डिबी पथकातील सहाय्यक फौजदार विजय शिर्के महिला पोलिस नाईक सोनाली माने प्रसाद दुदुस्कर श्रावण राठोड यांनी सकाळ पासूनच सनीच्या राहत्या घराच्या परिसरात सापळा रचला होता आणी तो दारुची दोन बॉक्स मध्ये विक्री करताना सापडला त्याच्या कडून पथकाने तब्बल ३६०० रुपये किमतीच्या ७२ देशी दारूच्या बाटल्या जप्त करुन सनी काशीनाथ भोसले वय ३० राहणार खानापुर ता.वाई यास ताब्यात घेऊन त्याच्या वर गुन्हा दाखल केला आहे .
COMMENTS