सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
पुणे-मुंबई एक्सप्रेस महामार्गावरील खालापूर येथे इको कार व कंटेनरच्या मंगळवार दि.१४ रोजी पहाटे झालेल्या अपघातात भोर तालुक्यातील चाळीस गाव खोऱ्यातील एक तरुणी मृत्युमुखी पडली तर चालकासह ५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
इको कार प्रवासी भरून पूनेहून मुंबईकडे जात असताना खालापूर जवळ माडक बोगद्याच्या पुढे आपत्कालीन झेप घेऊन कंटेनर वळत असताना इको कार एमएच -१२ आरवाय ३४७० या गाडीची पाठीमागून जोरदार धडक झाल्याने इको गाडीतील प्रवासी एएमएसी झालेली तरुणी अर्चना किसन राऊत रा. अंगसुळे ता.भोर वय २६ हीचा जागीच मृत्यू झाला तर ५ प्रवाशी गंभीर झखमी झालेची घटना घडली. मयत व गंभीर जखमी भोर तालुक्यातील असल्याने तालुक्यात शोककळा पसरली आहे.
COMMENTS