सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : सचिन पवार
विद्या प्रतिष्ठानच्या सुपे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांची मॅग्ना ऑटोमोटीव्ह प्रा.ली.तळेगाव दाभाडे येथील कंपनीमध्ये ऑनलाईन कॅम्पस ड्राईव्हच्या माध्यमातून निवड झाली आहे , दि.13 जून 2022 रोजी महाविद्यालयाने ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल अंतर्गत ऑनलाईन कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन केले होते.यामध्ये विद्यालयातील देवेंद्र सकट व गणेश लकडे यांची नोकरीसाठी निवड झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल पाटील व वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा. दत्तात्रय शिंदे आणि ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.दीपक कुंभार या सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी विशाल कोरे यांचे विशेष सहकार्य लाभले,
COMMENTS