सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी बाळासाहेब मिंड यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मिंड यांनी याच शाळेत शिपाई, शिक्षक व आता प्राचार्य असा थक्क करणारा प्रवास केला आहे.
त्यांचे परीसरातून कौतुक होत आहे.
याबाबत सोमेश्वर रिपोर्टर शी बोलताना प्राचार्य मिंड यांनी सांगितले, मी मुळचा बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे गावाचा माझें १२ वीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यावेळचे सोमेश्वर कारखान्याचे संचालक कै. रामचंद्र भगत यांनी मला सोमेश्वर विद्यालयात शिपाईच्या नोकरीवर लावले. घरची व शेतीची जबाबदारी असल्याने मी शिपाई म्हणून रात्रपाळीत काम केले. यावरच न थांबता पुढे शिक्षण करायचे हा चंग बांधून पूर्वी काकडे कॉलेज हे सकाळच्या सत्रात सोमेश्वर विद्यालयाच्या इमारतीतच भरत होते तेथे एफवाय ला प्रवेश घेतला. सकाळी कॉलेज दिवसभर शेतीची कामे तर रात्रपाळीत सोमेश्वर विद्यालयात शिपाई म्हणून काम ..१९८९ ला एमए चे शिक्षण पूर्ण केले मात्र शिक्षणाची गोडी काही शांत बसू देत नव्हती. १९८९ ला बीएड ला प्रवेश घेतला व ते शिक्षण पूर्ण करताच ज्या शाळेत मी शिपाई म्हणून कामे केले त्याच शाळेत मी १९९१ ला इतिहासाचा शिक्षक झालो. आनंद गगनात मावत नव्हता. विद्यार्थ्यांसाठी वेगळे काहीतरी करण्याची संधी मला मिळाली होती.
आणि त्याच शाळेत आज नोकरीची ३७ वर्ष पूर्ण करून आज त्याच शाळेचा आज मी प्राचार्य म्हणून धुरा सांभाळताना मला आनंद होत असल्याचे प्राचार्य बाळासाहेब मिंड यांनी सांगितले.याबद्दल सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, सर्व संचालक मंडळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शैलेश रासकर, सचिव भारत खोमणे यांनी अभिनंदन केले आहे.
COMMENTS