सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
तात्काळ मोजणी साठी गडदरवाडी येथील सोपान सोमनाथ मदने व इतर दोघांनी अवघे १५ गुंठे क्षेत्र मोजण्यासाठी १७ जानेवारी २०२२ तब्बल १२ हजार भरले. वास्तवीक अती अती तातडीची मोजणी एक महिन्याच्या आत करणे आवश्यक असताना सहा महिने उलटून गेले तरी मोजणी करण्यासाठी अजून भूमिअभिलेख चा माणूसच फिरकला नसल्याचा आरोप सोपान मदने यांनी केला असून मोजणी करणारच नासचाल तर आमचे पैसे आम्हाला परत करा अशी मागणी केली आहे.
याबाबत सोपान सोमनाथ मदने व इतर दोघांनी भूमिअभिलेख कार्यालयाला दिलेल्या अर्जात म्हणटले आहे की, आम्ही दिघे हिस्सेदारांनी अती अती तातडीचे पैसे भरलेले असून नवीन गट नं. ३८७ व जुना ९४२ चा रितसर कागदपत्रे देवून व रितसर १२,००० /- रक्कम भरलेली असून आमचे क्षेत्र सामाईक .०.१५ गुंठे असून ते मिळावे म्हणून पैसे भरलेले आहेत. परंतु ऑफिसने नेमलेले मोजणीदार मोजणीच्या ठिकाणी न येता व कोणीतरी माणूस पाठवून सर्व्हेच्या खुणा घेवून गेले. त्याचा दिनांक ५/३/२०२२ असून आम्ही वेळोवेळी ऑफिसला गेलो असता तफावत आहे असे सांगितले जाते. तेव्हा त्यांनी जे मार्ग सागितले तेही केले. परंतु हृद्द कायम अजूनही नाही. आम्हां गरीब शेतकऱ्यांवर ०.१५ गुंठे क्षेत्रासाठी एवढी मोठी रक्कम भरून अन्याय झालेला असून आमची हद्द कायम व्हावी हि विनंती. तसे न झालेस आम्हाला वरिष्ठांकडे दाद मागावी लागेल.