सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : प्रतिनिधी
बारामतीच्या जोगवडी गावात रस्त्याच्या लगत कडेला एका अवजड वाहनाची विद्युत लाईनच्या खांबाला धडक बसलीय. यामुळे सुमारे 11 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करा अशी मागणी ग्राहकांकडून मागणी आहे.
मुख्य लाईनच्या खांबाला अवजड वाहन धडकून दोन सबस्टेशन तब्बल तीन तास बंद होती. येथील मूर्टी सह लोणीभापकर सब स्टेशन या अंतर्गत येणाऱ्या तब्बल आठ ते दहा हजार वीज ग्राहकांची गैरसोय झाली. यापूर्वीही जोगवडी गावात अशाच घटना घडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता.
या भागात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामासाठी काही ठेकेदार माती व मुरूम वाहतूक करत असताना अशा घटना घडल्या आहेत. येथे निष्काळजीपणे वाहन चालून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या व्यक्ती व वाहनां विरुद्ध कायदेशीर कारवाई करा अशी ग्राहकांची मागणी आहे.
अशा घटनेत कारवाई टाळण्यासाठी काही राजकीय व प्रतिष्ठित व्यक्ती नाहक हस्तक्षेप करून शासकीय यंत्रणेला त्रास देत असतात. असा सर्व हस्तक्षेप झुगारून विद्युत वितरण कंपनीने आज झालेल्या घटनेची दखल घ्यावी अशी मागणी आहे. अन्यथा याविरुद्ध ग्राहक न्यायालयात तक्रार करू असा इशारा ग्राहकांनी दिला आहे.
COMMENTS