सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
कोऱ्हाळे ता बारामती येथील श्री सिद्धेश्वर पब्लिक स्कुलच्या ओंकार रामभाऊ खोमणे याने वडीलांच्या आचारी कामात मदत करत दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण संपादन केले.
रामभाऊ खोमणे यांचे शिक्षण आश्रमशाळेत झाले आहे. अर्धवट शिक्षण सोडून त्यांनी आचाऱ्याचा व्यवसाय सुरू करत घराला हातभार लावला. पण आपला पोरगा खूप शिकवा ही त्यांची अपेक्षा यामुळे त्यांनी ओंकारला सिद्धेश्वर पब्लिक स्कुल येते शाळेत प्रवेश घेतला. ओंकार देखील शाळा शिकत वडीलांचे आचारी काम जिथे सुरू असेल तिथे जाऊन त्यांना मदत करत होता.
त्याचे परिसरातून कौतुक होत असून संस्थेचे अध्यक्ष डी जी माळशिकारे व राहुल भगत यांनी अभिनंदन केले आहे.
COMMENTS