कौतुकास्पद ! 'सोमेश्वर' कारखान्यावर भजी तळणाऱ्या तुकारामच्या मुलीने दहावीत पटकावले ९२ टक्के गुण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्यावर हंगाम चालू असेपर्यंत चवदार भजी तळून लोकांच्या जिभेचे चोचले पुरवणाऱ्या तुकाराम खिलारे या ऊसतोडणी कामगारांच्या मुलीने दहावीच्या निकालात ९२. ४० टक्के गुण मिळवले. 
           पूनम तुकाराम खिलारे हिने जवाहर विद्या मंदिर निरगुडी ता पाटोदा जि. बीड येथे शिक्षण घेत दहावीच्या परीक्षेत ९२.४० टक्के गुण मिळवत शाळेत द्वितीय क्रमांक पटकावला. तुकाराम खिलारे हे आपल्या युवराज या भावसह गेली २५ वर्षापेक्षा अधिक काळ कारखान्याचा ऊस गळीत हंगाम सुरू झाला की ऊसतोडणी कामगारांसह सोमेश्वर कारखान्यावर दाखल होतात. मुलांच्या शिक्षणासाठी ते आपल्या कुटुंबाला सोडून व्यवसायासाठी दरवर्षी सोमेश्वर कारखान्यावर येत असतात.मोठा मुलगा सिव्हिल इंजिनीयर असून मुलीनेदेखील ९२ टक्के गुण मिळवले आहेत. पुनमच्या यशाने  तिचे परिसरातून कौतुक होत आहे.
         सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव व संचालक मंडळ यांनी केले आहे. 

To Top