सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परिक्षेत अपेक्षेप्रमाणेच मुलींनी बाजी मारली आहे. निंबुत (ता. बारामती) येथील बा. सा.काकडे विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून सानिका नेताजी काकडे हिने ९२.२० गुण मिळवून प्रथम, समीक्षा सचिन बनसोडे हीने ९०.४२ द्वितीय आणि कोमल रमेश बनसोडे हिने ८९ .८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.वाघळवाडी येथील उत्कर्ष माध्यमिक आश्रमशालेचा निकाल १०० टक्के लागला. धनंजय चोपडे याने ८५.८० टक्के गुण मिळवून प्रथम, ग्रिष्मा रसाळ व भीमा मदने ८३.४० द्वितीय आणि संजना हाके ७८.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत आणि आश्रमशाळेच्या प्राचार्या रोहिणी सावंत यांनी अभिनंदन केले. न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी या शाळेचा ९१. ६० टक्के निकाल लागला. चंदन शहाजी रेपे याने ९१. ६० गुण मिळवत प्रथम, आराधना संजय कांबळे हिने ९१.२० द्वितीय आणि साक्षी राजेंद्र नेवसे हिने ९०.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. न्यू इंग्लिश स्कूल मुरुम या भागशाळेचा ९६. ६७ टक्के निकाल लागला असून रोहित कैलास सोनवणे याने ९१. २० टक्के गुण मिळवत प्रथम, मंतशा नुरुल्लाह शेख ९१ टक्के द्वितीय आणि मुक्ता वसंत राऊत हिने ९० .८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.
सोरटेवाडी ग्रामविकास मंडळाचे माध्यमिक विद्यालय करंजे या शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून प्रतिक सुनिल होळकर याने ९४ टक्के गुण मिळवत प्रथम, श्रृतिका आनंदराव टकले ९०.२० गुण द्वितीय आणि प्रीतम दिलीप सोरटे ९० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सोमेश्वरनगर विद्यालयाचा ९६. ८७ टक्के निकाल लागला. तेजस्विनी दत्तात्रय सोनवणे हिने ९४.२० टक्के गुण मिळवत प्रथम, अंतरिक्षा नंदकुमार मोकाशी ९२.४० द्वितीय आणि सुयोग सुरेश येळे याने ९०.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, प्राचार्य बाळासाहेब मिंड यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
COMMENTS