सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

कौतुकास्पद ! चाकण हनुमंत देवकर ! हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाच्या प्रयत्नामुळे आदिवासींच्या डोक्यावरील हंडा उतरला


सोमेश्वर रिपोर्टर टीम------ 
चाकण : हनुमंत देवकर
चाकण एमआयडीसी : चाकण एमआयडीसीतील ए रेमॉंड इंडिया या कंपनीने आपल्या सीएसआर निधीच्या माध्यमातून खेड तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या तांबडेवाडी या आदिवासी गावाला पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. "यासाठी हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाने विशेष प्रयत्न केल्याने आदिवासी महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरला", असे प्रतिपादन ए. रेमॉंड इंडीया कंपनीच्या व्यवस्थापिका रंजना गायकवाड यांनी केले. 
          रंजना गायकवाड म्हणाल्या, "आम्ही सीएसआर निधी टाकण्यासाठी गावाच्या शोधात असताना पत्रकार हनुमंत देवकर यांनी तात्काळ १०० टक्के आदिवासी लोकवस्ती असलेल्या तांबडेवाडीचे नाव सुचवले. येथील पिण्याच्या पाण्याची योजना विस्कळीत झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे व महिलांना डोक्यावर हंडा घेऊन विहिरीवरून पाणी आणावे लागत असल्याचे सांगितले. आम्ही लगेच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मनीष पधारीया यांच्याकडे ही व्यथा मांडली, आणि त्यांनी लगेच होकार दिला. देवकर यांनी पाठपुरावा करून हे काम जून महिन्यात पूर्ण केले. आज ही योजना लोकार्पण करताना आदिवासींच्या चेहऱ्यावरील आनंद आम्हाला सदैव लक्षात राहील. हे गाव निसर्गाच्या कुशीत असून लवकरच आंम्ही दत्तक घेण्याचा प्रयत्न करू."
       ए. रेमॉंड इंडीया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मनीष पधारीया यांच्या मार्गदर्शनाखाली ४५० लोकवस्ती असलेल्या तांबडेवाडी या आदिवासी गावात सीएसआर निधी देऊन दहा हजार लिटर पाण्याची टाकी व नळ जोडणी करून पिण्याच्या पाण्याची व्यावस्था केली. कंपनीच्या व्यवस्थापिका रंजना गायकवाड व हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्ष हनुमंत देवकर यांच्या हस्ते या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. महिला अत्याचार तक्रार निवारण समिती एनडीआरएफ गृह मंत्रालयाच्या केंद्रीय सदस्या मंगलताई देवकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी सरपंच जयश्री सावंत, उपसरपंच आशा निधन, गणेश सावंत, माजी उपसरपंच कैलास निधन व ग्रामस्थ उपस्थित होते. 
         सरपंच सावंत यांनी उपस्थित मान्यवरांना बुके ऐवजी गुलाबाची रोपे देऊन स्वागत करून पर्यावरणाचाही संदेश दिला. तर माजी उपसरपंच कैलास निधन यांनी आभार मानले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पाण्याची टाकी सभोवताली सुशोभीकरणसाठी फुलझाडांचे रोपण करण्यात आले. 

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7031,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : कौतुकास्पद ! चाकण हनुमंत देवकर ! हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाच्या प्रयत्नामुळे आदिवासींच्या डोक्यावरील हंडा उतरला
कौतुकास्पद ! चाकण हनुमंत देवकर ! हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाच्या प्रयत्नामुळे आदिवासींच्या डोक्यावरील हंडा उतरला
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEitB-6-OdXTz8aDJFTA0ENwfXnAsGyEX0rYELfW2oZIFN6ahTPjr1HhPTGFZNhVGqFjSEE4Tf7pzwkX8HXn-BHRe8mY2ChoF9vnLe9SrFPpc5oG_8iJBfeXpQxCc21Z76Q69Zd_LMyS5Jdw/s1600/1658378376587553-0.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEitB-6-OdXTz8aDJFTA0ENwfXnAsGyEX0rYELfW2oZIFN6ahTPjr1HhPTGFZNhVGqFjSEE4Tf7pzwkX8HXn-BHRe8mY2ChoF9vnLe9SrFPpc5oG_8iJBfeXpQxCc21Z76Q69Zd_LMyS5Jdw/s72-c/1658378376587553-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/07/blog-post_37.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/07/blog-post_37.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy