सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर - प्रतिनिधी
मांढरदेवी महत्त्वाच्या वाहतुकीच्या मार्गावरील आंबाडखिंड घाटात पुन्हा जोरदार सुरू झालेल्या पावसामुळे मंगळवार दि.९ दरड कोसळली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्परतेने तसेच आंबाडे येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज खोपडे, सोपान खोपडे तसेच प्रकाश जाधवर यांनी रस्त्यावर दरडीतील मोठमोठ्या दगडी तसेच रस्त्यावर आलेला राडाराडा त्वरित बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.असे शाखा अभियंता योगेश मेटेकर यांनी सांगितले.
भोर आंबाडखिंड घाट रस्त्यावरून मांढरदेवी ,वाई, महाबळेश्वर तसेच पाचगणी या पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी आंबाडखिंड घाट जवळचा मार्ग असल्याने पर्यटकांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असते.सद्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने डोंगर माथ्यावरून पाणी वाहू लागले आहे. यामुळे दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. घाट रस्त्यावर काही धबधबे खळखळून वाहत असल्याने पर्यटकांनी त्याचा आनंद लुटत असताना रस्त्यावर दंगा मस्ती न करू नये तसेच सावधगिरीने प्रवास करावा असे आवाहन मेटेकर यांच्याकडून करण्यात आले. आहे.
COMMENTS