सोमेश्वर रिपोर्टर टीम------
जेजुरी : प्रतिनिधी
बारामती व पुरंदर तालुक्याच्या कारखाना कार्यक्षेत्रात वाढलेले उसाचे क्षेत्र व कारखान्याची गाळप क्षमता याचा विचार करता संचालक बाळासाहेब कामथे व इतर संचालक यांच्या मागणीनुसार पुरंदर मध्ये सोमेश्वर कारखान्याचे दुसरे युनिट सुरू करणे गरजेचे असल्याचे मत कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले.
खळद(ता.पुरंदर)येथे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या जन्मदिवसानिमित्ताने कारखान्याने राबवलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून खळद ग्रामपंचायतच्या वतीने "एक कुटुंब एक झाड" या उपक्रमाच्या माध्यमातून मोफत आंब्याच्या झाडाचे वाटप कार्यक्रम जगताप यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी संचालक सुनील भगत,शैलेश रासकर, किसन तांबे, शांताराम कापरे, जितेंद्र निगडे, बाळासाहेब कामथे, सरपंच दशरथ कादबाने, उपसरपंच आशा रासकर, माजी सरपंच कैलास कामथे, ग्रामपंचायत सदस्य रोहिणी कामथे, भाऊसाहेब कामथे, योगेश कामथे, चंद्रकांत कामथे, सुरेश रासकर, अंकुश कामथे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री जगताप म्हणाले की सोमेश्वर कारखान्याच्या वतीने सभासदांना आंबा व नारळाचे वाटप होत आहे याच माध्यमातून खळद ग्रामपंचायतीने गावातील ज्या सभासदांना ही झाडे घ्यायची नाहीत अशा सभासदांचे नावावरती झाडे खरेदी करत ती गावातील प्रत्येक कुटुंबांना मोफत देण्याचा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे सांगत कारखाना लाभक्षेत्रातील शेतकरी बांधव सतत नव्याने सभासद नोंदणीची मागणी करत आहे या पार्श्वभूमीवरती कारखाना लाभक्षेत्रात वाढणारे उसाचे क्षेत्र व कारखान्याची गाळप क्षमता यातील फरक पाहता नव्याने नोंदणी कशी करायची हा सर्वस्वी निर्णय आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांच्या वरती सोपवला जाईल असे त्यांनी सांगितले.
या गावाने कारखान्याच्या वतीने मिळणारा लाभ आपल्या गावातील नागरिकांच्या पर्यंत कसा पोहोचवता येईल व या झाडाची योग्य जोपासना व्हावी यासाठी याला "आईचे झाड" असे नाव देत आई विषयी आदरभाव व्यक्त करण्याचा उपक्रम हा समाजासाठी दिशादर्शक असल्याचे सुनील भगत यांनी सांगितले.
प्रास्ताविक दशरथ कादबाने यांनी केले तर आभार योगेश कामथे यांनी मानले.
COMMENTS