भोर ! संतोष म्हस्के ! भोरच्या पश्चिम भागात शिवसेनेची ताकत वाढली : समीर घोडेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते समीर घोडेकर यांनी शेकडो युवकांसमवेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत वरळी येथे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला .यामुळे भोर तालुक्यातील पश्चिम भागात शिवसेनेची ताकद वाढली आहे.
          वरळी येथे पक्ष प्रवेशाच्या वेळी शिवसेना उपनेते रविद्रंजी मिर्लेकर, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, पुणे जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे, भोर तालुका प्रमुख हनुमंत कंक हजर होते. यावेळी भोर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते समीर घोडेकर, संतोष शिवतरे, प्रमोद सोनवणे, सचिन बोडके, किरण दानवले, मयुर म्हस्के, उमाकांत गुजर, अमीत बोडके, अक्षय गायकवाड, राजेंद्र बोडके, अंकुश कंक यांनी प्रवेश केला.

To Top