सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून कृषी उपन्न बाजार समिती उपबाजार नसरापूर येथे शनिवार दि.८ राजगड ज्ञानपीठच्या मानद सचिव स्वरूपा संग्राम थोपटे आयोजित भव्य मोफत महाआरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर भरविले होते.या शिबिरातील ४५ रुग्णांना गुरूवार दि. १३ उपजिल्हा रूग्णालय भोर (रामबाग ) येथून देसाई हॉस्पिटल पुणे येथे शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले.
यावेळी वैद्यकिय अधिक्षक डॉ.पांडूरंग दोडके,
नेत्रतज्ञ डॉ.धिरडे, रूग्ण कल्याण सेवा समितीचे सदस्य सुनील साळेकर, सा.कार्यकर्ते राजेंद्र शेटे आदी उपस्थित होते.
COMMENTS