इंदापूर ! माणिकराव जगताप यांचे निधन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निमसाखर-: प्रतिनिधी
पंधारवाडी (ता. इंदापूर) येथील सामाजिक कार्यकर्ते माणिकराव बाळासाहेब जगताप वय वर्ष ८७ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
पंधारवाडी व परिसरात त्यांना तात्या या नावाने ओळखले जात होत.परिसरातील सामाजिक तसेच गरजु व्यक्तींची प्रशासकीय कामे मार्गी लावण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते तर २००५ पासून ते ज्योतिर्लिंग वाचनालय चालवत होते.अध्यात्मिक क्षेत्रात देखील ते कार्यरत असून ते वारकरी संप्रदायाचे पायिक होते. 
त्यांच्या पाठीमागे दोन मुले, मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. मुंबई येथील व्यवसायिक संपत जगताप व संजय जगताप यांचे वडील तर पत्रकार सत्यजीत रणवरे यांचे ते आजोबा होते.
To Top