सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबाडे ता.भोर येथील तालुका आदर्श शिक्षक खंडू शंकर घोलप यांच्या मातोश्री खानापूर गावच्या बुजुर्ग सामाजिक कार्यकर्त्या मुक्ताबाई शंकर घोलप (वय-७५ )यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पाच मुली ,एक मुलगा सूना ,नातवंडे असा परिवार आहे. तर तालुका आदर्श शिक्षिका अंजना जयवंत कोंढाळकर यांच्या त्या आई होत.