सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
रक्तदान हेच श्रेष्ठदान समजून भाटघर ता.भोर येथे श्री गणेश तरून मंडळ,श्री शिवप्रतिष्ठाण हिन्दुस्थान व स्वराज्यभुमी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यामाने भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते.रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली.मागील वर्षी नागरिकांमध्ये रक्तदान बाबत जनजागृती व्हावी या दृष्टीने वाठार,कारी,आंबवडे येथे रक्तदान शिबिर आयोजित केले गेले होते. याला भरभरून प्रतिसाद मिळाला होता.यावेळी अक्षय ब्लड बँकेचे महेश रणदिवे ,अभिजित अरनकल्ले,डॅा.पुजा दहीफोडे ,हार्षद वीर ,विशाल पन्हाळकर ,राजेद्र वीर, युवराज जेधे,राहुल गुजर,नितीन कुडले, संदिप खाटपे, सकेंत धनावडे ,स्वप्नील दळवी ,शुशांत झुनगारे ,मंगेश विर तसेच भाटघर ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS