सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रशांत ढावरे
तीन महिन्यापूर्वी लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील विट्ललवाडी ता. फलटण जि. सातारा येथील एका
१६ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीचे तिच्या घरातून अपहरण केल्या प्रकारणी लोणंद पोलिसांनी एकास सोलापूर मधून अटक केली आहे.
ऋषीकेश केशव जमदाडे रा.विट्ठलवाडी ता.फलटण जि.सातारा याला तळे हिप्परगा ता.उत्तर सोलापूर जि.सोलापूर येथून ताबेत घेवून तीन महिन्यांपूर्वी अल्पवयीन अपहरणाचा गुन्हा उघडकीस आणला. सदरचे घटनेपासून तो फरार असल्याचे निष्पन्न झाले. संशयित आरोपीचे मोबाईल नंबरचे तांत्रीक माहीतीचे आधारे पोलीस उपनिरिक्षक विशाल कदम व त्यांचे मदतनीस पोलीस कॉन्स्टेबल सुनील नामदास यांनी इतर माहीती प्राप्त करून त्याच्या आधारे आरोपी हा तळे हिप्परगा ता. उत्तर सोलापूर जि.सोलापूर येथे राहत असलेबाबत समजले. सदरील गजबजलेले ठिकाण असतानाही तसेच रात्रीची वेळ असतानाही पीएसआय कदम व पोलीस कॉन्स्टेबल सुनील नामदास यांनी बुध्दीकौशल्याने तपास करून पीडीत मुलगी व आरोपी यांना ताब्यात घेतले. या कारवाईत सपोनि सुशील भोसले पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम पो. हवा. सर्जेराव सूळ पो.कॉ. सुनील नामदास पो.कॉ.विद्ठल काळे यांनी सहभाग घेतला.
सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख, तसेच अपर पोलीस अधिक्षक वैशाली कड़कर व उपविभागिय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी सदर पीडीतेचे व अज्ञात आरोपीचे तपासाबाबत योग्य त्या सुचना व मार्गदर्शन केले.
COMMENTS