पुरंदर l निधन वार्ता l दिवे येथील प्रदिप काळे यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
दिवे (ता. पुरंदर) गावाजवळील काळेवाडी येथील पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, उद्योजक, पैलवान प्रदिप उर्फ तात्या हरिश्चंद्र काळे (वय ४३)  यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. काळेवाडी पंचक्रोशीच्या विकास कामात त्यांचा मोलाचा सहभाग होता.
      त्यांच्या मागे आई,बंधू दोन बहिणी, पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे.
    पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सचिव सुषमा काळे यांचे ते पती होत. तर प्रगतशील शेतकरी संदिप काळे यांचे ते बंधू होत.
To Top