सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
चांबळी (ता. पुरंदर )येथील विजयालक्ष्मी मुकुंद कामठे (वय ६७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या मागे पती ,दोन मुले ,एक मुलगी, सूना ,जावई ,नातवंडे असा परिवार आहे. शेती व्यावसायिक मुकुंद कामठे यांच्या त्या पत्नी होत. तर हिरामण बनकर माध्यमिक विद्यालय लॅब असिस्टंट घनश्याम कामठे, पगार व भविष्य निर्वाह निधी वेतन पथक माध्यमिक वरिष्ठ लेखनिक बन्सीलाल कामठे व साधना इंग्लिश मिडियम आदर्श शिक्षिका मनिषा लोळे यांच्या त्या मातोश्री होत.