सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : प्रतिनिधी
१ जून १९४८ साली महाराष्ट्रात अहिल्यानगर ते पुणे पहिली बस धावली. महाराष्ट्रातील अनेक बस स्थानकात आज लालपरीचा ७७ वा वाढदिवस साजरा होत आहे.
बारामती आगाराच्या अंतर्गत येणाऱ्या निरा बसस्थानक येथे एसटीचा ७७ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
निरा बसस्थानकात सर्व स्टँड ची सजावट करण्यात आली रांगोळी काढून महिला वाहक महिला प्रवासी यांचा वतीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. बसमध्ये व बसस्थानक परिसरात गुलाबाची फुले व प्रवाश्यांना पेढे भरवून एसटीचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. आजचा दिवसाचा आनंद वेगळाच आहे आज महाराष्ट्र मध्ये लालपरी च योगदान महत्वाचे आहे ७७ वा वर्धापन दिन साजरा करताना चालक वाहक प्रशासकीय कर्मचारी यांत्रिकी कर्मचारी यांनी एकमेकांना पेढे भरवले.
यावेळी बारामती आगाराचे वाहतूक निरीक्षक विशाल सावंत, विकास सावंत, भरत लकडे तसेच निरा बसस्थानक येथील वाहतूक नियंत्रक मल्हारी भंडलकर, कुलकर्णी व तसेच पुणे डिव्हिजन चे अविनाश कोरडे चालक इनामदार विनोद पवार शांताराम जगताप वाहक सुरण पवार, व्हि एन गीते, महिला वाहक पल्लवी बारवकर यांचा उपस्थित उत्साहात साजरा करण्यात आला.