सोमेश्वर रिपोर्टर टीम------
चाकण : प्रतिनिधी
पोहण्यासाठी तलावात गेलेल्या चार शाळकरी मुलांचा दमछाक झाल्याने बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
हि घटना शनिवार दि.३१ मे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. चाकणजवळील कडाचीवाडी (ता. खेड ) गावच्या हद्दीतील पाझर तलावात हा प्रकार घडला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी चिमुरड्यांचे मृतदेह बाहेर काढले.
ओमकार बाबासाहेब हंगे (वय. १३ वर्ष, सध्या रा. मार्तंडनगर, मेदनकरवाडी, मूळ रा. हंगेवाडी, ता. केज, जि. बीड), श्लोक जगदीश मानकर (वय.१३ वर्षे, सध्या रा. मेदनकरवाडी, मूळ रा. धनवडी, ता. वरुड, जि. अमरावती), प्रसाद शंकर देशमुख (वय. १३ वर्षे, सध्या रा. मेदनकरवाडी, मूळ रा. अंबुलगा, ता.मुखेड, जि. नांदेड), नैतिक गोपाल मोरे ( वय. १३ वर्षे, सध्या रा. मेदनकरवाडी, मूळ रा. बुलढाणा झरी बाजार, ता. अकोट, जि. अकोला) असे बुडून मृत्युमुखी पडलेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत.