Chhatrapati sugar factory l वडिलांच्या गाडीतून पृथ्वीराज जाचकांची एन्ट्री...! कारखान्याच्या पायरीपुढे झाले नतमस्तक : 'छत्रपती'ची धुरा अनुभवी पृथ्वीराज जाचकांकडे तर उपाध्यक्षपदी कैलास गावडे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भवानीनगर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक तर उपाध्यक्षपदी कैलास गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 
            उपमुख्यमंत्री अजित पवार सुचवलेल्या नावाची घोषणा यावेळी करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी काम पाहिले. 
------------------
वडिलांच्या गाडीतून बापूंची एन्ट्री
पृथ्वीराज जाचक यांचे वडील साहेबराव जाचक हे छत्रपती  कारखान्याचे चेअरमन तसेच संचालक देखील होते. त्यांचे वडील वापरत असलेली त्यांच्या गाडीतूनच पृथ्वीराज जाचक यांनी आज छत्रपती कारखान्यावर एन्ट्री केली. यावेळी ते कारखान्याच्या पायरी समोर नतमस्तकही झाले.
To Top