सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वेल्हे : मिनल कांबळे
राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि मेघडंबरी हटवण्यात आलेल्या प्रकाराबाबत मनसे पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष दसवडकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन संपूर्ण माहिती दिली. व राजगड वर छत्रपती शिवाजी महाराज यांनी 27 वर्षे राजधानी बनवून स्वराज्याचे कामकाज केले.
राजगड ही पहिली शिवकालीन वास्तू असून किल्ले राजगडावर शिवस्मारक झाले पाहिजे अशी मागणी केली. यावेळी संतोष दसवडकर यांनी केली.राजगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य आणि देखणे स्मारक उभारण्याबाबतचे निवेदनही राज ठाकरे यांना देण्यात आले.स्मारकाचे नियोजन, आराखडा आणि पुढील कार्यवाही याची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी
पुणे जिल्ह्यातील मनसे नेते बाबू वागस्कर, श्री. गणेश सातपुते. किशोर शिंदे व बाळासाहेब शेडगे हेही उपस्थित होते.
------------------------
राजगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी मनसेतर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. स्मारक उभारण्यासाठी लागणारे पाठबळ, जनआंदोलन आणि सरकारवर दबाव निर्माण करणे या सर्व टप्प्यांवर मनसे तुमच्यासोबत उभी राहील.
राज ठाकरे (मनसे अध्यक्ष)