सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वेल्हे : मिनल कांबळे
भोर विधानसभा मतदारसघातील पर्यटन विकास आराखडा तयार करुन भोर विधानसभा मतदारसंघातील तीनही तालुके पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत बैठक आयोजित करण्याची मागणी भोर मुळशी राजगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. 
आमदार शंकर मांडेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भोर - मुळशी - राजगड (वेल्हे) विधानसभा मतदारसंघ हा निसर्गसंपन्न, ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध असा परिसर आहे. येथे रायरेश्वर किल्ला, तोरणा किल्ला, राजगड किल्ला, रोहिडेश्वर किल्ला, वीर धरण, नीरा देवघर धरण, पानशेत धरण, मुळशी धरण, टेमघर धरण, गुंजवणी धरण,
घाटमाथ्यावरील सुंदर निसर्गदृश्ये, सह्याद्री पर्वतरांगा, कोरीगड, घनगड, कैलासगड, तैलबैल, तिकोणा किल्ला यांसारखे ऐतिहासिक किल्ले तसेच अंधारबन, ताम्हिणी घाट, यांसारखी निसर्गरम्य स्थळे आणि खारावडे येथील म्हसोबा देवस्थान, डावजे येथील निळकंठेश्वर, नसरापूर येथिल बनेश्वर मंदिर, वेल्हे तालुक्यातील शिरकाई देवीचे मंदिर श्री मेंगाई देवी श्री मळाई देवी यांसारखी धार्मिक स्थळे तसेच लवासा हिल, सहारा लेक सिटी, मांडवखडक, पिरंगुटची इंजाई, अंधारबन, ताम्हिणी घाट, मिल्की रिंग धबधबा आणि विविध पारंपरिक सण व उत्सव यांच्या माध्यमातून पर्यटनाची संधी निर्माण होणार आहे शक्यता आहे. पर्यटनाच्या दृष्टीने भोर विधानसभा मतदारसंघास पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करावे, तसेच या भागाचा सर्वंकष पर्यटन विकास आराखडा तयार करण्यासाठी संबंधित विभागाबरोबर समन्वय ठेवून एक तातडीने बैठक आयोजि करुन या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा प्रशासन, पर्यटन तज्ज्ञ व संबंधित हितधारक यांचा सहभाग राहील, जेणेकरून एक शाश्वत व परिणामकारक पर्यटन विकास आराखडा तयार करता येईल असे निवेदनात आमदार शंकर मांडेकर यांनी म्हटले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पर्यटन मंत्री शंभुराज देसाई जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे निवेदनाद्वारे लवकरात लवकर भोर विधानसभा मतदारसंघ पर्यटन म्हणून घोषित करणेबाबत आणि पर्यटन विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने बैठक आयोजित करण्याबाबतची मागणी आमदार शंकर मांडेकर यांनी केली आहे.