सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वेल्हे : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील शेतकऱ्यांना बियाणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे याचे कारण म्हणजे कृषी विभागाकडून बियाणांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सूचना करण्यात आलेले आहेत. यांची शेवटची मुदत 29 मे पर्यंतच आहे परंतु गेली कित्येक दिवस शेतकरी बियाणांसाठी अर्ज करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु शासनाचा सर्वर बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाण्यापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
राजगड तालुक्याला तांदळाचे आजार म्हणून ओळखले जाते . पाच हजार हेक्टर वर तांदळाचे पीक तालुक्यात घेतले जाते.तालुक्याची अर्थव्यवस्था ही शेतीवरच अवलंबून असल्यामुळे शेतकरी शेतीवर अवलंबून आहेत. तालुक्यातील इंद्रायणी हे मुख्य पीक असून इंद्रायणी तांदळास भरपूर मागणी आहे पुणे सातारा सोलापूर सांगली येथील व्यापारी नसरापूर बाजारपेठेतून इंद्रायणी तांदळाची खरेदी करत असतात. तालुक्याचे सर्व अर्थकारण शेती क्षेत्रावर असल्यामुळे शेतकऱ्यांना बियाण मोठ्या प्रमाणावर लागत आहे परंतु यावर्षी शासनाने याबाबत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची आव्हान करण्यात आले आहे. राजगड तालुक्यात इंद्रायणी, रत्नागिरी कोलम इत्यादी भात पिके घेतली जातात याचे बियाणे शेतकऱ्यांना अद्याप तरी बाजारात उपलब्ध नाहीत . अगोदरच अवकाळी पावसाने शेतकरी मेटाकुटीला आला असून शासनाच्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची मुदत देखील संपत आली असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात यावी तसेच सर्वर ला झालेला प्रॉब्लेम लवकरात लवकर संपवावा अशी मागणी शेतकऱ्या वर्गाकडून केली जात आहे.
-------------------
बियाण्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वर बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज भरता येत नाही याबाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयास कळविण्यात आले आहे लवकरच याबाबत योग्य ते निर्णय घेण्यात येऊन शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी अर्ज करता येईल.
सुनील ईटोळे तालुका कृषी अधिकारी राजगड
-------------------
सर्वर बंद असल्यामुळे बियाणांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईना. बियाणे वेळेतच मिळाले पाहिजे अन्यथा त्याचा फायदा होणार नाही.
रविंद्र करंजकर शेतकरी कोंढवली
------------------
बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी वारंवार दुकानात येत आहेत परंतु शासनाकडून अद्याप कोणतेही बियाणे उपलब्ध न झाल्याने शेतकऱ्यांना बियाणे देता येत नाही.
आनंद देशमाने कृषी दुकानदार वेल्हे