Ashadhi Wari l परकाळे यांचे मानाचे अश्व सोपानकाका पालखी सोहळ्यासाठी सासवडकडे मार्गस्थ

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
श्री संत सोपानकाका महाराज पालखीतील अश्वांचा मान अंजनगाव (ता. बारामती) येथील परकाळे कुटुंबियांकडे आहे. परकाळे यांची तिसरी पिढी मानाच्या दोन अश्वासह पालखी सोहळ्यात मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने सेवा करत आहे. यंदाही परकाळे बंधू मानाचे अश्व घेवून पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सासवडकडे मार्गस्त झाले. 
       ब अंजनगाव येथील येथील कै. रामचंद्र उर्फ बबुराव आण्णा परकाळे यांना  सोपानकाका पालखीत अश्वांचा मान मिळाला आहे. ही सेवा तीन पिढ्यापासून अखंडपणे सुरु आहे. सुरवातीला बबुराव आण्णा नंतर त्यांचा मुलगा कै. सोपान परकाळे यांनी १५ वर्षे सेवा केली. तसेच गेल्या पाच - सहा वर्षापासून परकाळे यांच्या तिस-या पिढीतील अजित परकाळे, राजेंद्र परकाळे, मयुर परकाळे हे अश्वासह सेवा करत आहेत. हे मानाचे अश्व आषाढी वारीसाठी सासवड ते पंढरपूरकडे पालखी सोहळ्यात पुढे चालत असतात. 
           आज  (दि. २०) शुक्रवारी सकाळी अंजनगाव येथे परकाळे यांच्या अश्वांचे मोठ्या भक्तीमय वातावरणात सासवडकडे प्रस्थान ठेवण्यात आले. यावेळी टाळ मृदूंग व हरेनामाचा जयघोष करण्यात आला. व गोड भोजनानंतर मानाचे अश्व सासवडकडे मार्गस्थ झाले. 
 यावेळी पालखी सोहळा प्रमुख ह. भ.प.त्रिगुणमहाराज गोसावी,  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती  विश्वास आटोळे, प्रमोद काकडे , उद्योजक सुरेश परकाळे, लक्ष्मण जगताप,  बाळासाहेब परकाळे, दिलीप परकाळे, हनुमंत जगताप  यांच्यासह भजनीमंडळ व वारकरी संप्रदायिक मंडळी उपस्थित होते. 
____________
To Top