सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी ता. बारामती येथील विमल रामचंद्र भोसले यांचे दि. ७ रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सेवानिवृत्त शिक्षक व वाणेवाडी ग्रामपंचायतचे सदस्य अजित भोसले यांच्या त्या मातोश्री होत.