सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील आंबी बु||. येथील शेतकऱ्याच्या घरासमोरील चोरीला गेलेला ट्रॅक्टर २४ तासात हस्तगत करण्यात सुपे पोलिसांना यश आले.
यासंदर्भात बाळा उर्फ अविष्कार संजय तावरे ( वय २३ वर्षे रा. मोरगाव ), धिरज संदिप चव्हाण ( वय १८ वर्षे रा.मुर्टी ), रोहन ज्ञानेश्वर माने ( वय १९ वर्षे रा. मोढवे ), चेतन कानोबा दगडे ( वय २५ वर्षे रा. मोढवे ), ओमकार रमेश पवार ( वय २७ रा. मोरगाव, तर सर्व जण ता. बारामती जि.पुणे ) आदींवर पाच जणांवर गुन्हा दाखल करुन पोलिस कस्टडी देण्यात आली आहे.
पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील आंबी बु||. येथील शेतकरी राजेंद्र बबन खोमणे यांचा स्वमालकिचा ५ लाख किमतीचा जॉनडियर कंपनीचा ( मॉडेलचा ५०४५ ) हिरव्या रंगाचा ट्रॅक्टर तसेच ३० हजार किमतीचा लाल रंगाचा नांगराची चोरी १ जुनच्या मध्यरात्रीला जाली. २ जुनला सकाळी घरासमोर ट्रॅक्टर आणि नांगराची चोरी झाल्याचे उघडकिस आले.
याबाबतची फिर्याद खोमणे यांनी पोलिस स्टेशनला दिली. त्यानंतर सुपे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मनोजकुमार नवसरे यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार किसन ताडगे महादेव साळुंके व भाऊसाहेब चौधरी यांना गुन्हयाचे तपासा बाबत योग्य त्या सुचना देवुन तपास पथक रवाना करण्यात आले.
या गुन्ह्याबाबत गुप्त बातमी दारामार्फत मिळालेली माहितीनुसार व तांत्रीक तपास तसेच सी.सी.टिव्ही फुटेज वरुन या पाच संशयीत आरोपींना ताब्यात घेवुन चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे २४ तासातच आरोपींच्या मुस्क्या बांधण्यात सुपे पोलिसांना यश आले. अधिक तपास सहा. फौजदार वसंत वाघोले करीत आहेत.
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागिय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुप्याचे स.पो.नि. मनोजकुमार नवसरे, पो. स. ई. जिनेश कोळी, पो. हवा. रुपेश साळुंके, राहुल भाग्यवंत, संदिप लोंढे, विशाल गजरे, दत्तात्रय धुमाळ, पो. कॉ. किसन ताडगे, महादेव साळुंके, भाऊसाहेब चौधरी, ऋषीकेश विर, निहाल वणवे, सुरज साळुंके, सचिन दरेकर, सागर वाघमोडे, तुषार जैनक, सचिन कोकणे, आदेश मवाळ आदींनी ही कामगिरी केली.
.....................................