Baramati News l बारामती तालुका आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुका आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब दत्तात्रय शेंडकर (वय ६० ) वर्ष यांचे आज दि. 2 रोजी निधन झाले. 
      त्यांच्यामागे दोन मुले ,एक मुलगी ,सुनबाई,नातवंडे असा परिवार आहे. २०१९ साली सैनिक संघटना स्थापन झाल्यापासून ते अध्यक्ष होते. बारामती सह इतर तालुक्यातील अनेक सैनिकांचे वाद मिटवून त्यांनी खूप मोठे काम केले होते. रक्तदान शिबीर,आरोग्य शिबिरे,सोमेश्वर मॅरेथॉन,अशा अनेक उपक्रमात ते धडाडीनेकाम करत असत. कोरोना काळात सांगली,शिरोळ सह सैनिक टाकळी येथे सुमारे तीन ट्रॅक सामानासह मदत सैनिक संघटनेद्वारे करणेत आली त्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. संघटनेद्वारे १५० च्या वर  सैनिकांचे वाद त्यानी पुढाकार घेऊन मिटविले. परिसरात बचत गटाद्वारे देखील त्याने मोठे काम केले.त्यांचे निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
To Top