सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
भारत ज्ञान विज्ञान समुदाय बारामती ( BGVS) यांच्या वतीने बिजीव्हिस ज्ञान विज्ञान गप्पा या कार्यक्रमात वार गुरुवार दि.12 जून 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता सोमेश्वर इंजिनिअरिंग कॉलेज सोमेश्वरनगर येथे पार पडत आहे.
बारामती येथील अभिजीत चौधर व वाघळवाडी येथील विकी खवळे हे दोघे मुख्य पाहुणे येत असून "तिमिरातून तेजाकडे" या विषयावर संवाद साधण्यासाठी येत आहेत. अभिजीत चौधर यांनी यूपीएससी 2024 परीक्षेत 487 रँक मिळवत दैदिप्यमान यश मिळवले आहे. तर एमपीएससी 2023 चा नुकताच निकाल लागला असून त्यात विकी खवळे यांची सहसंचालक वित्त व लेखा विभाग महाराष्ट्र राज्य या पदी निवड झाली आहे. MPSC/UPSC स्पर्धा परीक्षा बाबत माहिती , सोबत त्यांचा संघर्ष व आजपर्यंतचा प्रवास या गप्पा मध्ये उलगडेल. उपस्थित श्रोते यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देखील मिळू शकतील. तरी बारामती तालुक्यातील स्पर्धा परीक्षा उत्सुक विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक यांनी या गप्पात सामील व्हावे असे बीजीव्हिएस (BGVS BARAMATI) बारामती वतीने आव्हान करण्यात येत आहे.