Baramati News l ग्रामीण भागातली पोरं आता...शहरात चमकणार..! बारामतीच्या गदिमा सभागृहात होणार 'सर्किट नाना'चा लाईव्ह शो

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : महेश जगताप
बारामती तालुक्यात सोमेश्वरनगर भागातील शेतकऱ्यांच्या पोरांनी रिल्सवर धुमाकूळ घातला घालत लाखो विव्हस मिळवीत आहेत.  हृदयाला भिडणारे व्हिडिओ करून नेटकाऱ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. 
            याच ग्रामीण भागातील पोरांनी आता बारामती येथे सर्किट नाना लाईव्ह शो या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.  दि. २९ रोजी सायंकाळी ६ वाजता विद्या प्रतिष्ठान येथील गदिमा सभागृहात या लाईव्ह शो चे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे दिग्दर्शक/निर्माता -आकाश पांडुरंग भापकर, लेखक सहाय्यक, सूरज रणदिवे, दिग्दर्शक-प्रतिक अनिल लकडे,
पार्श्वसंगीत वैभव टकले, उमेर बागवान, संगीत दिग्दर्शक- वैभव टाकले, नेपथा ऋतुजा बाठे, प्रकाशयोजना अभिप्राय कामठे व  रंगभूषा आणि वेशभूषा
माधवी नवले यांनी केले आहे. यामध्ये स्वरूप भिलारे, अतुल कदम, शेखर पाटोळे, माधवी नवले, अभिषेक गायकवाड, श्रवणी जगताप, सुप्रिया तळेकर, प्रविण बारवकर, आयुष सोरटे, सूरज रणदिवे, यश चव्हाण, राहुल काकडे, प्रतिक लकड़े आणि आकाश पांडुरंग भापकर हे प्रमुख भूमक्केत असणार आहेत.
To Top