सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती व इंदापूर तालुका को-ऑपरेटिव्ह सुपरवायझिंग युनियनच्या अध्यक्षपदी धन्यकुमार रावासो जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
बारामती सहाय्यक निंबधक संस्थेचे अमर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. २६ रोजी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ही निवड करण्यात आली. यावेळी माजी अध्यक्ष दादा पाटील खोमणे, पांडुरंग निंबाळकर, नंदकुमार रणवरे, अशोक मुळीक, दिग्विजय जगताप, शहाजी जगताप, राहुल जगताप, सागर काकडे, रवी जगताप, विक्रम जगताप, अविनाश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.